पुणे येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातून ४९ कसलेले खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा एका वर्षात दोन वेळा होतात. एक स्पर्धा समुद्रात खेळविली जाते. तिला कोस्टल म्हणतात तर दुसरी स्पर्धा इनलॅन्ड म्हणजे तलावात खेळविली जाते. पुण्यातील स्पर्धा खडकवासला येथे घेण्यात आली.
स्पर्धेत झालेल्या १० रेसमधून qचतन ७ रेसमध्ये अव्वल आला. बोट नियंत्रित करणे, तिचा समतोल राखणे, वाèयाचा अचूक अंदाज घेणे या शक्तीस्थळांच्या जोरावर त्याने ही स्पर्धा लिलया जिकली. चिंतन हा कुलाबा येथील केंद्रीय विद्यालयात इ. ९ वी मध्ये शिकतो आहे. त्याचे वडील मुकेशभाई हे मरीन सेवेत असून त्यांच्यामुळेच या खेळाची आवड चिंतनमध्ये निर्माण झाली. आपल्या यशाबद्दल बोलताना चिंतन म्हणाला की, ‘या अजिंक्यपदामुळे मला खूप आनंद झाला आहे, मी दोन वर्षांपासून सेलिग खेळ खेळत असून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे ध्येय डोळ्यासमोर आहेङ्क.
चिंतनच्या यशाबद्दल मुंबई यॉट क्लबचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी आनंद व्यक्त केला आहे. या अजिंक्यपदामुळे सेलिग खेळातील नवी मुंबईचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. यापुढे क्लबचे खेळाडू आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीत करतील, असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.
चिंतनचे प्रशिक्षक असलेले अमेय जाधव यांना त्याच्याबद्दल प्रचंड आशा आहेत.चिंतन भविष्यात भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नजिकच्या काळात होणाèया आशियाई स्पर्धेत चिंतनची निवड होईल,अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.